शेतकरी बाप
शेतकरी बाप
1 min
175
राबतो शेतकरी बाप
अंधाऱ्या राती शेतात
घास मिळतो तेव्हा
भुकेल्या साऱ्यांच्या पोटात
पर्वा नाही त्याला
अंधाऱ्या रात्री जीवाची
काळजी त्याला साऱ्या
जगाच्या पोटाची
भिती नाही त्याला वाटे
ऊन पावसाची
वाट पाहतो बळीराजा
सुगीच्या दिवसाची
अन्न दाता सुखी जगी
साऱ्यांना वाटते
डोंगर दुःखाचे सदैव
त्याच्या भोवती दाटते
सुखाचा घास घेता सारे
आपल्या हाताने
हयातभर राबणारा शेतकरी
प्राण सोडतो कर्जाच्या बोजाने
शेतकऱ्याची काय सांगू
तुम्हाला कथा
राबणाऱ्या पोशिंद्याच्या चरणी
जग झुकविते माथा
सदैव मिळो साऱ्यांच्या
मुखी घास सुखाचा
सलाम असेल युगे युगे
शेतकरी बापाला जगाचा
