पत्रकार दिन
पत्रकार दिन
लेखणी बघा त्यांची धारदार
लढते अन्यायाची लढाई आरपार
महाराष्ट्राचा बुलंद आवाज दर्पणकार
असा दमदार आमचा पत्रकार
निर्भिड विचारांनी करतो प्रहार
लोकशाहीचा हा खंबीर आधार
नका समजू त्याला भंगार
लेखणीत असे त्याच्या अंगार
दुःख, वेदना वार्ता मांडतो
शश्राविना हा व्यवस्थेशी भांडतो
न्याय, हक्कांसाठी निर्भिडतेने भिडतो
लेखणीने कुविचारांचे कंबरडे मोडतो
अन्याय ,अत्याचाराला फोडतो वाचा
भ्रष्टाचार्यांच्या फोडतो लेखणीने काचा
सर्वांग सुंदर पत्रकार हा साचा
हल्लेखोरांनी फोडल्या असंख्यांच्या टाचा
