अस्वस्थ अश्वत्थामा
अस्वस्थ अश्वत्थामा
अवघड अनाकलनीय अंधारी वाट..
अस्वस्थ आत्मे अन् भयाण स्मशानघाट..
धावाधाव, अगतिकता विनवण्या अफाट...
भयाण वेदनांनी भळभळते ललाट..
प्राणवायू,रुग्णालये एखादा आसरा..
शोधत फिरणाऱ्या भिरभिरत्या नजरा..
महासत्ता, लोकशाही सगळं काही खोटं...
जनतेच्या नशीबात नेहमी दुःख फार मोठं..
पत्नी वा मुलगी कोणी गमावली माऊली...
मुलगा, पती कोणी गमावली बापाची सावली..
घेऊन फिरतो..भळभळत्या जखमा भाळाच्या....
अश्वत्थाम्याच्या नशिबी वेदना अनंत काळाच्या..
