आचारसंहिता ....!!!
आचारसंहिता ....!!!
आज सकाळी सकाळी
माझ्या मुलाने विचारले ....
आचारसंहिता म्हणजे काय हो ?
मी थोडा गोंधळलोच की ,,,
मग स्वतः ला सावरून बोललो ,
अरे , जेव्हा जनतेचे नेत्यांना
हात जोडून पाया पडणे
बंद होते ,,,,
आणि
नेत्यांचे जनतेच्या
पाया पडून हात जोडणे
सुरू होते ,,,,
ह्या कालावधीला
आचारसंहिता म्हणतात .... !
त्याला कितपत समजले
माहीत नाही , पण
तो फक्त भाबडेपणाने
होकारार्थी मान हलवीत होता