दुष्काळ
दुष्काळ
आला भीषण दुष्काळ
तळपे सूर्य माथ्यावर
मुक्या पशुपक्ष्यांची दशा
वाटे केव्हा येईल सुकाळ
आटले नद्या नाले सारें
तहानली लहानथोरं
थेंब मिळंना पाण्याचा
तोंड वासत्याती जनावरं
पीकं गेल्याती वाळून
शेतंरानंबी भेगाळली
कवा पावंल वरुणदेव
बळीराजा पाहें वाटुली
सावकाराच्या कर्जापायी
बळीराजा घेई गळफास
गळाठला तो दुष्काळानं
.काय सांगील लेकरांस
केली गलती आम्ही
वृक्षवेली तोडण्याची
... नको देऊ सजा देवा
दुष्काळाच्या आपत्तीची
करुनि वृक्षारोपण
झाडें वाढवू रानांत
लेकरांच्या आयुष्याची
नको आता वाताहात
