Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sagar Bandar

Tragedy

3  

Sagar Bandar

Tragedy

मरण.... तू सुध्दा

मरण.... तू सुध्दा

1 min
3K


मरण...तू सुध्दा......


मरण...तू सुध्दा असतोस

माझ्या जगण्याचाच एक भाग,

तूच समजावून सांगत राहतोस

इथं कसं ते वाग ! ....


स्मशानात तुझं अस्तित्व

पाहतो उघड्या डोळ्यांनी,

अन् जगणं कळतं

जीवनाच्या विविध अंगांनी...


सुखासीन दिवस काढताना

काळाचा होतो घाला,

अगदी शहाणपणातून बेफिकीरपणाला

घालावा लागतो आळा...


स्वर्ग आहे की नर्क

नसतो इथं कुणास ठाऊक,

तरीही कठोरपणे कर्तव्य निभावताना

होत राहतो कधीतरी भाऊक...


सरणावर चिता जळताना

त्यासोबत सारंच संपतं,

पण,हातून घडलेलं चांगलं

आठवणीनं नक्कीच मागं उरतं...


येताना काही सोबत आणलेलं नसतं

जाताना तरी कुठं नेता येतं ?

क्षणिक सुखाचा संसार तरीही

जगण्याचं मात्र शहाणपण देतं !


जन्म अन् मरणातील दुवा

म्हणजेच असते अमुल्य जीवन,

जाणीवेतून चांगले कर्म करता

जगण्याला लाभते आनंदाचे कोंदण...


आयुष्यभर अंगाला मेकअप करत

मनाला घडवणं विसरत राहतोस,

कधीतरी येता मरणाचं निमंत्रण

धायमोकलून पश्चातापाचं रडगाणं गातोस...


मरण,तसं तू सर्वांचा नावडताच

तरीही तुझं स्मरण असतं नित्य,

आयुष्याच्या सारीपाटावरील क्षणभंगूरतेचं

तुझ्यानंच उलगडतं सत्य...


तू,कधीतरी गाठशीलच देहाला

कशाला मिरवायचा खोटा अभिमान,

जे मिळायलंय कर्मानं आता

तोच व्हावा आत्मसन्मानाचा स्वाभिमान...


मी तटस्थपणे पहात राहतो

सुख - दु:खाचा खेळ सगळा,

मनात चांगला भाव जपताना

आपसूकच होतो मरणाचा सोहळा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy