Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sagar Bandar

Inspirational

2.0  

Sagar Bandar

Inspirational

भारतमाता तूच आमुची देवता

भारतमाता तूच आमुची देवता

1 min
365


तू जिजाऊ.. तूच सावित्री...

तुझ्या कर्तृत्वाची मशाल

अखंड राहती तेवत......


शिक्षणाच्या सुसंस्कारातून

अंधारात वाट काढत उजळत

राहती प्रकाशाच्या दाहिदिशा....


अन्याय,अत्याचार सहन करुनही

न डगमगता धैर्याने लढत राहून

जिंकलीस अस्तित्वाची लढाई.....


शिवराय, स्वामी विवेकानंद यासारखे

अलौकिक व्यक्तीमत्व देशासाठी

ठरले भूषणावह ही तुझीच किमया...


तुमच्याच कार्याचा वारसा चालवतात

इथे आव्हानांचे अमर्याद डोंगर पेलून

अनेकजण न थकता,न हारता....


तुझ्याच संस्कारातून फुलते

थोर आमुची भारतीय संस्कृती

ठेवू आम्ही याचाच सार्थ अभिमान...


स्त्री भ्रूणहत्यासारखे पाप

आता कधीच न घडावे हातून

यासाठी करतो मनोमनी निर्धार...


लेकीलाही लेकासमान वाढवून

स्त्री- पुरुष समानतेचा आदर्श

जगात अभिमानाने मिरवू.....


बेटी बचाओ,बेटी पढाओ

याचे महत्त्व जाणोनि मनोमनी

प्रबोधनाचा करु अविरत जागर....


तूच आमुची भारतमाता

तूच आमुची देवता ,

वंदन तुजला करितो

तुझ्या चरणी ठेवूनी माथा....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational