STORYMIRROR

Murari Deshpande

Tragedy

4  

Murari Deshpande

Tragedy

वृक्ष

वृक्ष

1 min
564

कागदावरी लिहिले जाते चला वाचवू वृक्ष

सहजच आले ध्यानी आणि विचलित झाले लक्ष

वृक्ष तोडूनी कागद बनवून त्यावरती संदेश

याचमुळे तर आला अडचणीत आपला अवघा देश

जिथे मेळ ना कधीच दिसतो उक्ती आणि कृतीचा

तिथे ठाकतो प्रश्न उभा मग रोजच हा नीतीचा

उरेल जंगल कागदावरी भीषण भविष्यकाळ

अशीच आपण तोडत गेलो हिरवाईशी नाळ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy