STORYMIRROR

Mangesh Medhi

Tragedy

3  

Mangesh Medhi

Tragedy

यात्रा

यात्रा

1 min
1.2K


चालत रहावे वाट पुढे काय ठाव

उतरायचे अन, कुठे काय ठाव ?


वाटले बसावे घडीभर तरी

विसावा मिळे, कुठे काय ठाव


हा मार्ग रोजचाच तरी नवा रोज

दिशा कोणती ईथे काय ठाव


धावणे मागे मागे कासावीस जीव

शुभ्रजल हाती पडे काय ठाव


कुठला प्रवास निघालो कशास

भेटले बेट हे कसे, काय ठाव


संपला प्रवास मोजकेच श्र्वास

प्रारंभीच असा असे, काय ठाव ?


चालत रहावे वाट पुढे काय ठाव

उतरायचे अन, कुठे काय ठाव ?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy