STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Tragedy

3  

Sanjay Raghunath Sonawane

Tragedy

दुष्काळ

दुष्काळ

1 min
833



आला दुष्काळ, दुष्काळ

दुःख धरतीच्या हृदयात

केले घायाळ लोभीवृत्तीन

झाली धरतीची चाळन


हिरवी पालवी झडली

उन्हाच्या तप्त झळयांनी

हिरवीगार पीके वाळली

भर उन्हाच्या ज्वालांनी


सारे जीव कासावीस

पळती पाण्याच्या आकांताने

पाण्याच्या थेंबा थेंबांसाठी

व्याकुळ झाले पाणी पिण्यास


घाम पाझरे अंगातून

उष्ण उन्हाच्या कहराने

जीव धावती हो सारे

गार वाऱ्याच्या दिशेने


नदी, धरण आटले

एकटे दगड, वाळू दिसले

मानवाची हाव संपता संपेना

जलचरांना मृत्युस धाडले


नदी,ओढे, तलाव

होता गरीबांचा आधार

उदरनिर्वाहाचे काहींचे साधन

मिळते पोटाला भाकर


तप्त अवनी तापली

भेगा साऱ्या धरतीला

डोळे तिचे पाणावले

लागला जीव टांगनीला


गगनाचे सारे पक्षी

कडक उन्हाने तापले

थंडगार सावलीच्या आश्रयाला

झाडावर गोळा झाले


पक्षी ,प्राण्यांचे निवारे

तेही ओस पडले

चारापाण्याच्या शोधात

चारी दिशात उडाले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy