चवदार पाणी
चवदार पाणी
भीमराय झगडले न्यायासाठी
चवदार पाण्याच्या या हक्कासाठी ॥
खुले करुनिया चवदार तळे
बहुजना न्याय न् समता मिळे॥
झाली पाण्यामुळे अनोखी किमया
मिळे नवशक्ती जीवन जगाया॥
वाट चुकल्या जीवाना पाणी सांगे
शोध स्वतः घेण्यासाठी जावे मागे ॥
दिनानाही प्रेरित पाण्याने केले
मानवास त्याने मी पण दिधले ॥
साठवून ,वापरू हे सारे पाणी
देश वाचवू , वाटू दे मनोमनी ॥