ऋण आईचे
ऋण आईचे
1 min
764
*विषय - ऋण आईचे
***********************
आयुष्याच्या वाटेवरती
कूस प्रेमाची लाभली
तुझ्या वात्सल्याच्या छायेत
आज भाग्यवंत जाहली
तुझ्याविणा मिळत नाही
कोठे आधार मज मायेचा
डोईवर हात असू दे
सदा तुझ्या आशीर्वादाचा
जीवनाच्या संकटकाळी
राहा तुझा हात हाती
मुळीच मज वाटणार नाही
काळोखाची मग भिती
आई असे मुर्ती प्रेमाची
सकलांची माय माऊली
चारधाम ही जणू वसती
तिच्याच मंगल पाऊली
न ऋण जन्मदेचे फिटे
लाख लाख उपकार तिचे
ईश्वर चरणी करते इच्छा
मिळाे सदा प्रेम आईचे
~~~~~~~~~~~~
सौ.कोठेकर योगिता संजय
निगडी पुणे
~~~~~~~~~~~~
