अमुल्य वेळ
अमुल्य वेळ
अमुल्य वेळ
कोठेही ना खरेदी विक्री
बाजारात ना पैशानी मिळे
अमुल्य अशी वेळ ही
वांदे होतील ही जर टळे
यशाची सापडे चावी
ज्यास वेळेचे कळे महत्व
हातून गेल्यास गवसत नाही
असे वेळेचे हो तत्व
वेळेचा सदुपयोग करता
सर्व कामे मार्गी लागती
उदयावर सांगा ढकलली
कोण तुमच्या संगे येती ?
वेळेची जो ठेवेल जाण
त्यालाच सर्व मिळेल छान
वेळेची करता गुतवणूक
समजेल परतफेडीचे हे स्थान
