कष्टकरी
कष्टकरी
विषय = कष्टकरी
कामगार कष्टकऱ्यांना
धन्यवाद करु या
कष्ट त्यांचे स्मरुनिया
चला, मान त्यांचा, राखू या ॥
मिळेल ते काम करण्यासाठी
गाव आपुला सोडती
घाम गाळुनी आपला
रक्ताचे पाणी करती ॥
दिनरात ,पाऊस पाणी
नसे फिकीर कशाची
हातावरचे पोट त्यांचे
तमा असे भाकरीची ॥
काम करुनी उन्हातान्हात
मनगट मजबूत बनती
कुटूंबासाठी श्रम करुनी
जगास आधार देती ॥
ठाऊक नसे सणवार
दसरा अन् दिवाळी
तरी जीवनात विसे
त्यांच्या मौजमजा निराळी