STORYMIRROR

Dinesh Kamble

Tragedy

3  

Dinesh Kamble

Tragedy

रेशीमगाठी

रेशीमगाठी

1 min
1.6K


रेशीमगाठी

______________________

झाली आज जय आहे.

तुझ्या माझ्या ग प्रेमाची..

बांधल्या गेल्या रेशीमगाठी.

जडली संगत ही जन्मोजन्माची..


ज्या विश्वासाने टाकीले तू

माझ्या पावलासवे तुझे पाऊल..

प्रयत्नं माझा राहील सदा .

दुखःची तुला ना लागो चाहूल..


जिवापाड जपायचा आहे.

रेशमी नात्यातला नाजूक हा बंध..

मला नित्य शोधायचा आहे

तुझ्या डोळ्यांत माझा आनंद..



मनातले भाव प्रामाणिकपणे सांगतो

राहील सदैव तुझ्या ऋणात मी...

तुझा असतांना हातात हात.

नेहमीच खूष असेल जिवनात मी...



दिली तुला मी वचने सप्तकोटी.

चालतांना सोबतीने सप्तपदी..

खांद्याला खांदा माझ्या भिडवूनी राहा..

दमूनी भागूनी नको मागे थांबू तू कधी..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy