STORYMIRROR

Dinesh Kamble

Fantasy Children

3  

Dinesh Kamble

Fantasy Children

बालपण

बालपण

1 min
369

माझ्या बालपणी 

भारी मौज होती

माझ्या दिमतीला 

मोठी फौज होती

फर्मान मी देता

मिळे दूध पोळी 

माझ्या आवडीची

लेमनची गोळी 

माझ्या मालकीची

असायची माडी

गल्लीभर माझी 

पळायची गाडी 

माझ्या आवडीचा 

असे व्यवसाय 

पोलीस, डॉक्टर 

कधी डाकू काय

अजाण वयात 

अल्लड अक्कल 

लहान मोठ्यांची 

करून नक्कल 

न धरो अबोला

भांडणानंतर

मैत्रीत आमच्या 

न येई अंतर

आनंदीत भारी 

असायचे मन

नितांतसुंदर 

होते बालपण 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy