विचार
विचार
टोलवले कितीही विचार
तरीही फिरूनी परत येतात
भलत्याच वेळी आडपावलाने
प्रचंड वेगाने मनात शिरतात
टाचा उंचावून कितीदा पाहती
विचार माझे मलाच दावती
तुझ्या शब्दांना मिळे दाद
हिच तुझ्या विचारांची पावती
विचार येती मनात जेव्हा
नका थांबवू त्यांना तेव्हा
दबलेल्या विचारांची नाहीतर
काहिली होईल पहा
