काय करू मी
काय करू मी
उरल्यासुरल्या अवशेषांचे काय करू मी
निर्जीव झालेल्या देहाचे काय करू मी
हिरवळ होती तोवर गर्दी भारी होती
स्वार्थासाठी त्यांनी केली यारी होती
मलाच ठावे किती कुंठलो एकांताने
गैरफायदा केवळ लुटला मिळेल त्याने
जोवर होती फळे लगडली माझ्या ठाई
दूर गावची जवळ पाखरे येईजाई
पानगळीचा नियम कुणाला चुकला नाही
भोगल्याविना भोग कुणीही सुटला नाही
©®दिनेश अ .कांबळे ,छ.संभाजीनगर
