STORYMIRROR

Dinesh Kamble

Abstract Romance Tragedy

2  

Dinesh Kamble

Abstract Romance Tragedy

प्रेम संपणार नाय!

प्रेम संपणार नाय!

1 min
32

प्रीतीत आपल्याही न्यारेच पेच आहे 

आरोप लावलेस तू काही खरेच आहे


ओढ तुझ्या भेटीची होती मनाला 

ती आस अजूनही जीवंत आहे 

दूर आहोत यामुळे कदाचित 

प्रिये, प्रीतीचा प्रवाह जरा संथ आहे 


तुझ्यामुळे माझ्या जीवनाला  

येत आहे प्रीतीचा सुगंध

तुझ्या असण्याने असतो 

माझ्याही जीवनी नित्य आनंद


हास्य तुझे भारी मनोहारी

त्यातच तुझा तो जीवघेणा राग

तुझ्या प्रेमाने माझ्याही उरी 

पेटवून दिली प्रेमळ आग 


होतील भेटी कोणत्या वळणावर

नशिबी नेमके आपुल्या काय

एक मात्र मनोमनी सांगतो साजणी

हे प्रेम कधीही संपणार नाय

प्रेम कधीही संपणार नाय


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract