ललना
ललना
पहाट पहाट होता होता
या नयनांना स्वप्न पडले
ध्यानीमनी नव्हते जे जे
ते ही माझ्या सोबत घडले
या मनाच्या सातबाऱ्यावर
तिच्या नावाचे गाव बसले
पाहून मनोहारी हास्य तिचे
तिच्यासह तेथे सारेच हसले
देखणेपण तिचे ऐसे भावले
सुंदरसे ते भावविश्व नटले
या सृष्टीच्या प्रत्येक निर्मितीत
तिचे देखणे प्रतिबिंब उमटले
आजवर कुणा जे जमले नाही
त्या ललनेने सहजच साधले
नाजूक ओठांवर स्मित पसरवून
माझ्या मनाला तिनेच बाधले

