STORYMIRROR

Dinesh Kamble

Abstract Romance Tragedy

3  

Dinesh Kamble

Abstract Romance Tragedy

वीज सळसळली नाही

वीज सळसळली नाही

1 min
166

घालमेल बावऱ्या जिवाची 

कशी तुला गं कळली नाही 

मी धावत आलो तुझ्या दिशेने

तू माझ्याकडे का वळली नाही 


मनी भावना झाल्या अनावर 

अवतरल्या मग कागदावर

डोळेही सगळे बोलून गेले 

विरह घटिका टळली नाही 


नदीकाठची तुझी ती वचने

भेट दिलेली सुगंधी सुमने

गळून गेला कोवळा बहर तो 

प्रीत बाग फळफळली नाही 


गळून गेली जुनीच खपली 

जखम तेवढी काळाने जपली 

आज कशी माझ्या स्पर्शाने

देही वीज सळसळली नाही 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract