STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Tragedy

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Tragedy

दुष्काळ

दुष्काळ

1 min
701




अरे दुष्काळ दुष्काळ

घसा पडला कोरडा

गेलं पाणी खोल खोल

पार सुकला नरडा....!!


सर्व विहीरी कोरड्या

नाही पाण्याचा रे थेंब

कधी पडेल पाऊस

मन होईल रे चिंब.....!!


तन घामानं भिजलं

माती ढेकळं फुटली

किती करू मरमर

कशी कंबर कसली....!!


नाही चारा रे गाईला

गाय दावनी बांधली

कसा दुष्काळ दुष्काळ

गाय कशी हंबरली....!!


माझी कपीला हरणी

गेलं पोट खपाटीला

काय करू ते कळेना

जीव लागे झुरणीला....!!


अरे दुष्काळ दुष्काळ

नका तोडू वृक्ष सारी

करा लागवडी वृक्ष

सृष्टी दिसेल ना भारी....!!


पाणी जपून वापरा

सांडू नका पाणी पाणी

थेंब थेंब महत्त्वाचा

गाती रे जीवनगाणी....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy