Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Tragedy

3  

Chandan Pawar

Tragedy

जातीयता

जातीयता

1 min
590


प्रत्येकाच्या माथी-कपाळी

जाती-पातीचा शिक्का;

जातीयतेची ही मालिका

म्हणजे धक्क्यावर धक्का.


शाळा प्रवेश दाखल्यावरच

जात-पोटजातीचा कॉलम;

जातीयतेची जखम भरण्याकरिता

आणणार कोठून मलम?


काढली तरी जात नाही

"जात"एवढी हट्टी;

माणसा माणसातील उंची

मोजायला जातीचीच मोजपट्टी.


जातीला जातीतला भेटता

काहीही करायला राजी;

जात निकषात आकाशासम

माणसेही होतात खुजी.


जातीयतेचे 'कास्टिंग' करून

जातविक्रीचा जणू धंदा;

भारताच्या विकासात जातीयता

म्हणजे फाशी का फंदा.


जातीयतेवरून ओबामांच्या

भारताला कानपिचक्या;

'समान नागरी कायद्याच्या'

उच्चाराने सत्ताधाऱ्यांना उचक्या.


भल्या भल्यांची जातीय

रंगरांगोटीपूढे अक्कल गहाण;

जातीभेद निर्मूलनाची

कधी शमेल हो तहान?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy