STORYMIRROR

Chandan Pawar

Inspirational

4  

Chandan Pawar

Inspirational

संकल्प...

संकल्प...

1 min
0

जातीयतेच्या विकृत प्रथेमुळे भीमराय 
वर्गाबाहेर बसूनच शाळा शिकले ..!
तरी जगप्रसिद्ध 'कोलंबिया' विद्यापीठात 
'शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी 'ठरले..!!

जुलमी जाचक प्रथा-परंपरांचे दहन 
करून जातनिर्मूलनाचा पाया रचला..!
स्वतंत्र भारताचे ' संविधान ' लिहून
सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला..!

' ज्ञान तेथे मान ' उक्तीसम ज्ञानी
 होऊन 'ज्ञानसूर्य - ज्ञानसम्राट ' झाले..!
'Symbol Of Knowledge' म्हणुनी 
या 'महामानवास ' जगाने गौरविले..!!

' शिक्षण घेऊन भविष्य उजळू या ' 
डॉ. आंबेडकरांचा आदर्श घेऊ या.. 
'सारे शिकूया पुढे जाऊ या' जाणीवेने 
'शाळा प्रवेश' दिनी संकल्प करू या..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational