STORYMIRROR

Chandan Pawar

Classics

4  

Chandan Pawar

Classics

प्रेरणा..

प्रेरणा..

1 min
0

कसे सांगू तुला तू माझ्यासाठी काय आहेस ?
शब्द अपुरे पडतील अशी तू मनातील भावना आहेस..

तू बोलत असली की मनाला बरे वाटते 
तुझ्या नजरेत पाहिलं की आयुष्य अर्थ घेते 


माझ्या थकलेल्या मनासाठी तू विश्रांतीचा सहारा..
मी हरवलो की तूच पुन्हा सापडणारा सहारा..

तू प्रश्न नाहीस, ज्यांची उत्तरे शोधावी..
तूच ती जाणीव आहेस, जी मनाने रोज अनुभवावी..

तू नसतानाही तूच आजूबाजूला असतेस..
माझ्या प्रत्येक क्षणात, श्वासात वसतेस..

कसं सांगू तुला, तू माझ्यासाठी काय आहेस 
तू माझं जगणं आहेस, तूच गरज आहेस..

तू माझा आज आणि उद्या आहेस..
तूच माझ्या लेखणीची प्रेरणा आहेस..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics