व्हायचे आहे..
व्हायचे आहे..
मला केव्हातरी तुझ्यासमोर हरवायचे आहे,
तुझ्या नजरेतले एक स्वप्न व्हायचे आहे...
तुझ्या मनात दडलेली खंत घेऊन ये तू,
मला तुझ्या प्रत्येक वेदनेत उतरायचे आहे...
तुझ्या ओठांवर थांबलेले शब्द व्हायचे आहे,
तुझ्या शांततेत दडलेले अर्थ व्हायचे आहे...
तुझ्या आठवणींनी जेव्हा रात्र दाटून येईल,
मला तुझ्या उशाशी चांदणं व्हायचे आहे...
तू विसरशील म्हणता म्हणता पुन्हा आठवशील,
मला तुझ्या मनात कायमचे राहायचे आहे...
तुझ्या आणि माझ्यात अंतर कितीही राहो,
मला तुझ्या श्वासांमध्येच जगायचे आहे
