भुगा..
भुगा..
सखे प्रेमाच्या डावात तू
कायमच दगा दिलास..!
काळजाच्या खोल उखळात
माझ्या भावनांचा भुगा केलास..!!
विचारही केला नाहीस तू
घाव किती गहरा होता..!
काळीज चिरलस तू माझे
ज्यात तुझा चेहरा होता..!!
सोडलीस जरी कायम साथ तू
मी वचन मात्र पाळल होत..!
भावनेच्या हळव्या निखाऱ्यावर
अंतर मन जाळलं होत..!!
इथे रोज एकांतात बसुन
तुझ्या विरहाचे गीत गातो..!
या उदास मनाच्या आरशात
तुझीच प्रतिमा पाहतो..!!
