सदिच्छा..
सदिच्छा..
आहेस तू सुंदरी स्वर्गातील, की नभातील एखादी परी,
तुझ्या रूपाची मोहिनी, साऱ्या जगतावर भारी.
नयनी तुझ्या सखू सागर, नी शांततेचा भास,
तुझ्या एका स्मितहास्याने, सुटे सुखाचा सुवास.!
कांती तुझी जणू चंद्राची, लखलखते चांदणे,
तुझ्या पावलांच्या तालावर, सृष्टी गायी गाणे.
कपाळी तुझ्या तो बिंदू, जणू उगवता सूर्य खास,
तुझ्या सान्निध्यात वाटे, चैतन्याचा सहवास.!
अधर तुझे जणू गुलाबाच्या, उमलत्या त्या पाकळ्या,
तुझ्या बोलांतून ओघळती, मधाच्या गोड धारकळ्या.
भाळी तुझ्या लटा खेळती, जणू रेशमाचे जाळे,
तुला पाहता नभीचेही, चंद्र-सूर्य झाले वेडे.!
स्वर्गातील ती अप्सराही, तुला पाहून लाजेल,
इंद्रलोकीच्या दरबारी, तुझेच नाव गाजेल.
तू आहेस तेज पुंज, तू सौंदर्याची खाण,
तुझ्या रूपाने वाढली, या धरतीचीही आण.!
तुझ्यासम कोणीच नाही हे सत्य नसे खोटे,
तुझ्या रूपाचे वर्णन करण्या, शब्द पडती छोटे.
जन्मदिनी सदिच्छा सोज्वळता तुझी फळो -फुलो
सुख समृद्धी यशदायी निरामय आयुष्य मिळो !
