STORYMIRROR

Chandan Pawar

Classics

4  

Chandan Pawar

Classics

माझी...

माझी...

1 min
4

माझी ..

लिहितो तिच्यावर कविता
ती मनातील माझी ..!
हरवून बसलो हृदय तिच्यात
नजरेला नजर माझी जुळता..!!
 
वाढत गेले प्रेम, जिव्हाळा
एकमेकास बोलता बोलता..!
मन होते माझे कसे बावरे 
तिच्यापासून दूर मी जाता..!!

उदास होतो मन लागत नाही
चैन पडत नाही तिला न बोलता..!
डोळ्यात दाटते पाणी माझ्या
आठवण तिची मनात येता..!!
     
मी तिचा गुलाम अन
ती माझ्या मनाची राणी..!
 रंगत गेली आमच्या प्रेमाची
अशी अधुरी गोड कहाणी..!!

लिहायला तिच्यावर आवडते
कमीच आहेत या कविता..!
आहेच तू सुंदर सोज्वळ
अशी माझी..... ..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics