STORYMIRROR

Bipin More

Abstract Classics Inspirational

4  

Bipin More

Abstract Classics Inspirational

अबोल की शांत

अबोल की शांत

1 min
398

अठ्ठावीस युग उभा आहेस

अजिबात थकला नाहीसं??


कंटाळला असशीलच

मग सांगत का नाहीस..


आमचं फक्त ऐकत राहतोस

बोलावंसं वाटतं नाही??


ओरडायचं मनात असतं

मग मोकळा का होत नाहीसं


रखुमाई शेजारीच आहेत

तिथं सुद्धा पाहत नाहीसं


तुझ्या संसारात आम्ही आलोय

हक्कानी रागावत सुद्धा नाहीसं


असा कसा रे विठुराया तू इतका निराळा

अबोल आहेस पण शांत नाहीस


पण आता.. तुझा राग पाहायचा आहे

आवाज ऐकायचा आहे सर्वांना 


कळू दे तरी आम्हा वैष्णवांना

की आमचा " देव " तू फक्त "दगड" नाहीसं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract