स्पर्श पावसाचा
स्पर्श पावसाचा
शहारल्या धरणीला ,स्पर्श पावसाचा झाला ,
रंग हिरवा प्रेमाचा, पानोपानी बहरला ||१||
दाटूनी मेघ आले , घन निळा ओथंबला ,
झुलतांना फुलास पाहून , वारा गालात हासला ||२||
रूणुझुणू वाजवीत वेणू , बरसल्या सरीमाला
स्वर झाले चिंब ओले , सूर धरणीला गवसला ||३||
बेधुंद झाल्या दिशा , नाद प्रीतीचा गुंजला
अंतरीचा हळवा भाव , सुगंधात पार भिजला ||४||
नटली वसुंधरा , साज सृष्टीला चढला
जणू कुण्या चित्रकाराने , फिरविला रेशमी कुंचला ||५||
अस चांदणपाऊस , रोमारोमात भिनला
जाता जाता हळूच कानी , एक गूज सांगून गेला ||६||