हिरवाई
हिरवाई
नको रे असे घाव घालू ,
आमुच्या अस्तित्वावरी
बांध सेतू संवेदनांचा
मानवा तू आतातरी ...
उभा जन्म वाहतो आम्ही ,
तुझ्याच रे सुखापरी
जाळतो उन्हात देह आमुचा
छाया तुला देण्यापरी ...
आता तरी कळाव्या तुला ,
अंतरीच्या मूक यातना
आमुच्याच अस्तित्वात आहे
तुझ्या जीवनाची चेतना ...
वसुंधरेची शपथ घेऊनी
पुन्हा फुलव तू हिरवाई
तेव्हाच खुलेल तुझ्या जीवनी
आनंदाची गर्द वनराई ...
