STORYMIRROR

Shubhangi H. Kore

Inspirational

4.0  

Shubhangi H. Kore

Inspirational

तू माय मराठी माझी

तू माय मराठी माझी

1 min
275


मायेच्या गंधात न्हालेली ,

साक्ष उत्तुंग प्रेमाची 

मंजूळ , हळव्या भावनांची ,

तू भाषा लाख ह्रदयाची 

तू माय मराठी माझी , तू माय मराठी माझी ||१||


शौर्याने तळपणारी ,

तू भाषा शूरवीरांची 

तेजस्वी इतिहास तुझा ,

तू गाथा बलिदानाची 

तू माय मराठी माझी , तू माय मराठी माझी ||२||


तूज लाभला वारसा संतांचा ,

तू भाषा अपार भक्तीची 

रूप तुझे सोज्वळ गं ,

जणू&n

bsp;तू शोभा मंदिराची 

तू माय मराठी माझी , तू माय मराठी माझी ||३||


कधी रसाळ तुझी बोली , 

कधी रांगडी कणखर पोलादी 

नसूनी केवळ भाषा तू ,

तू माऊली आहेस सकलांची 

तू माय मराठी माझी , तू माय मराठी माझी ||४||


अटकेपार फडकवी झेंडा ,

तू भाषा समग्र विश्वाची 

गर्व बाळगूया सर्वांनी ,

तू भाषा अभिमानाची 

तू माय मराठी माझी , तू माय मराठी माझी ||५||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational