STORYMIRROR

Shubhangi H. Kore

Classics

3  

Shubhangi H. Kore

Classics

तुझ्या मंदिरास

तुझ्या मंदिरास

1 min
144

तुझिया दर्शनाची , धरूनिया आस 

धावत मी आले देवा , तुझ्या मंदिरास ||धृ||


दाटली आसवे लोचनी अपार 

अभागी जीवाला तुझाच आधार 

क्षणोक्षणी होतो, तुझा मज भास ...

धावत मी आले देवा , तुझ्या मंदिरास ||१||


तू रूद्रप्रिया ,तूच विघ्नहर्ता 

तू सकलांचा भाग्यविधाता 

नाम तुझे ओठी, चित्ती तुझा ध्यास ...

धावत मी आले देवा ,तुझ्या मंदिरास ||२||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics