श्रावण
श्रावण
रिमझिम बरसल्या श्रावणधारा
अलवार वाहे , हा गार वारा
हिरवी स्वप्ने घेऊनी आला ,
साजरा , लाजरा श्रावण आला ...
सृजनाचा आविष्कार तू न्यारा
आसमंती दरवळे , परिमल सारा
फुलांची गंधपावले लेऊनी ,
धरणीस भेटावयास तू आला ...
नभाने उधळल्या , धवलशुभ्र गारा
मनमोराचा कसा फुलला पिसारा
सणांचा राजा , मिरवीत आला
आला आला , श्रावण आला ...
