जय श्रीराम
जय श्रीराम
चैत्र शुद्ध नवमीला
कौसल्या पुत्र जन्मला
प्रभू श्रीराम अयोध्येचा
सत्य वचनी राजा ठरला
भगवान विष्णुने घेतला
सातवा अवतार भूवरी
संहारण्या दुष्ट दानवा अन्
रामराज्य अयोध्ये नगरी
एक वचनी, बाणी, पत्नी तो
फक्त राम एक रामायणात
वचनासाठी भोगला वनवास
अलौकिक बंधूप्रेम भावंडात
वानरसेनेसह केला संहार
लंकेश्वराचा, पत्नी सितेसाठी
त्यागिले तिजला एकटीला
आदर्श राम राज्यासाठी
