फक्त आईच.....
फक्त आईच.....
बोलायला न येणार्या बाळाला,बोलायला शिकवते
आणि शिकवणाऱ्या तिलाच,बाळ कधी खूप बोलते
ते समजून घेणारी फक्त आईच असते....
ऊन असो वा पाऊस,सुखात असो वा दुःखात
कायमच पाठीशी रहाते,माया तिची वेडी असते
अशी फक्त आईच असते.....
आयुष्याच गाण सुरेल आणि अर्थपूर्ण बनवते
कुठलच शीर्षक नसणारी,भावपूर्ण कविता असते
ती आपली आई असते......
मेघांप्रमाणे वात्सल्य गाढ,जिच्या पोटात वसते
सागरा प्रमाणे अथांग, पृथ्वी प्रमाणे उदार असते
ती फक्त आईच अस
ते.......
संस्कारांना जपून दुःख सावरायला पदरात घेते
लेकरासाठी मायेच्या बळाला पंखात ती भरते
ती फक्त आईच असते......
सदैव लेकरांच्या आनंदात आनंद आपला मानते
दुःखाचे चटके सोसूनही चेहर्यावरचे हास्य सावरते
ती फक्त आईच असते.......
अमोल घन छाया,तसे असीम आभाळही असते
हे त्याच लेकराला कळते,जे आई विना असते
कारण आभाळमाया आईच असते.......
आयुष्याचे शिल्प घडवायला चंदना प्रमाणे झिजते
सृजनाची ती दिव्य मूर्ती, अखंड मनमंदिरी रहाते
वंदन आई तू ते....वंदन आई तू ते.....