आठवणींचे पक्षी
आठवणींचे पक्षी
1 min
224
अधीर स्मृतींचे दाणे टिपण्या,गर्द मनीचे वृक्षी
मधुर साथ ही घेवून आले, आठवणींचे पक्षी
दाटून आले आठवणींचे नभ काळे ओले
त्या धारेने हरखून गेले, भिजून चिंब जहाले
मन पाखरू ओलेते डोकावे, गत काळीच्या गवाक्षी
परतता तयातून ओढाळही मन, रूसले काळावरती
मृदू मधु थेंबे भरते ओंजळ, डोळे ओले हसती
आसवांच्या गाथेला या ठेवूनीया साक्षी
