पिसे
पिसे
रम्य उषेला साद घालते, स्वप्नवेडी पहाट
शोधता परी ना मार्ग दिसे धुक्यात हरवली वाट
का असे घडावे, आक्रंदत मन रूसते काळावरती
यालाच म्हणावे जीवन आणखी हीच दैवगती
वाटते हसावे अन हसवावे, संगे अवघ्यांना फुलवावे
गुंजन करूनी भ्रमरासम त्या, जीवन मधुही प्राशुनी घ्यावे
वास्तवात पण हे घडे कसे? स्वप्न खरोखर स्वप्न असे
सत्त्यात उतरण्या अधीर मना, जडले परी हे तरल पिसे
