पुरुषोत्तम राम
पुरुषोत्तम राम
जगी सर्व एकच असतो
हाच तो पुरुषोत्तम राम
दास हा त्याचा हनुमान
वदतोय मुखाने श्रीराम
सीताराम अयोध्यापती
आदर्श पत्नी आणि पुत्र
दशरथ कौसल्येचा राम
जोडीले नात्यांचेही सूत्र
कैकेयीमातेच्या इच्छेस्तव
भोगला बारा वर्षे वनवास
उद्धारिले सती अहिल्येस
केलेला चित्रकूटावर वास
लक्ष्मण सीतासंगे तयाने
त्यागिले मानाचे सिंहासन
भरताने बंधू प्रेमाने केले
रामपादुकांचे तेच आसन