STORYMIRROR

satish kharat

Classics

3  

satish kharat

Classics

टिपूस

टिपूस

1 min
218

कूळ मातीच उजाड

रान सारे पेटलेले,

नाही झाडांना सावल्या

पानपान गळलेले.


असा उन्हाचा तडाखा

नदी,नाले आटलेले,

खाली तापली धरणी

वर नभ फाटलेले.


दाना नाही, पाणी नाही

असे व्याकुळले सारे,

पिलांसाठी दिनवाणी

कुठे गेलीत पाखरे?


झालं काळीज पाषाण

जीव सोसवेना भार,

गावं,शीव सुकलेली

आर्त गोठ्यात हंबर.


तळ मनाचा कोरडा

नाही डोळ्यात टिपूस,

थेंबभर पावसाने

फक्त उजळावी कूस.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics