STORYMIRROR

satish kharat

Others

3  

satish kharat

Others

बुद्धाचा मार्ग

बुद्धाचा मार्ग

1 min
385

अंधारलेल्या वाटेवर

प्रकाशफुलांचे सडे टाक,

शस्त्राविना क्रांती पेरून

करुणेचे मळे राख.

शोषितांची ढाल हो

विद्रोहाची मशाल हो

क्षणाक्षणाला लक्ष्य कर...

कणाकणाला स्पर्श कर...

'स्वंयप्रकाशाने' प्रज्वलीत होवून...

न्यायासाठी लढ...

          तोच बुद्धाचामार्ग...!


पायात घोटाळलेली चळवळ, 

किड्या-मुंग्याची वळवळ.

एकमेकांना दिलेले दोष,

पडद्याआडून ठेवलेले रोष...

विचार शुध्द ठेव,

डोक्यात बुध्द ठेव.

विज्ञानाची वाट धरून...

झोपडीत ज्ञानाचा दिवा लाव...

          तोच बुद्धाचा मार्ग...!


भ्रमिष्ट झालेल्या वाटसरूनां

ज्योतीबाचा 'आसूड' दाखव,

शिवरायांचं 'स्वराज्य' सांगून

'चवदार तळ्याचं पाणी ' चाखवं...

'कबिरांचे दोहे' सांग, 'सुदाम्याचे पोहे ' दे...

सान कोवळ्या हातामध्ये,

पुस्तकांच भविष्य देवून...

समतेचे पाठ शिकव...

          तोच बुद्धाचा मार्ग...!


मानवप्राणी समान सारें

रक्ताचाही रंग तोच,

आकाश,धरती, विश्व,तारे

राव तोच,रंक तोच.

सुकर्माने वंद्य हो...

'बोधीसत्वाने' धन्य हो...

'बोधीवृक्षाचं' बीज घेऊन...

माणसांत मानवतेचे रोप लाव...

          तोच बुद्धाचा मार्ग...!


Rate this content
Log in