उन्हं
उन्हं
1 min
182
तुझ्या दारात ऊन सांडलेलं,
आणि मी सावल्या शोधायला निघालेलो.
पण, सावल्या उन्हाच्या कवडशांनी गोंदलेल्या...
वाऱ्याची झुळूक नाही,
झाडांच्या फांद्या स्तब्ध, नि:शब्द
किंचितशा थरथरणाऱ्या...!
आताशा सावल्या लांबत नाहीत
तुझ्या दारापर्यंत,
हल्ली,पानझडीचा ऋतू असल्याचं
निष्पर्ण झाडांनी हळूच
माझ्या कानात सांगितलेलं...!
