आसवांत धारा नाही...
आसवांत धारा नाही...
1 min
241
मी इथला वारा नाही
मी तिथला तारा नाही.
ही करणी केली कोणी?
पावसात गारा नाही.
मी घरटे बांधू कोठे?
फांदीवरी थारा नाही.
शापित ही रात्र गेली
चंद्रबनी पारा नाही.
दुःख रक्ताच्या नात्याचे
आसवांत धारा नाही.
