मायबापा विठ्ठला...
मायबापा विठ्ठला...
1 min
246
सावळ्या विठ्ठला
पंढरीच्या बापा
कर्ता करविता
सकलांचा...
चंद्रभागे तिरी
कौतुके सोहळा
वैष्णवांचा मेळा
आनंदाचा...
संसार व्यापला
पुण्याई सांडली
कृपेची सावली
आम्हावरी...
तुझ्या भेटी लागे
चातकाचा ठावा
माऊलीचा धावा
पदोपदी...
वैकुंठ नायका
आलोया शरण
वंदितो चरण
मायबापा...
