तुला घट्ट बिलगायचं...
तुला घट्ट बिलगायचं...
1 min
245
कुठल्याशा एखाद्या क्षणी
खुशाली कळवत जा
मन साशंक होत नाही.
आताशा आयुष्य म्हणजे
जुगार झालंय नुसतं
मुठीतले श्र्वास हवेत कधी विसरतील
सांगताही यायचं नाही!
मित्रा,
मी मात्र भयभीत नाही
व्हायचं ते होईलच
सध्या तरी
अथांग अंधाऱ्या रात्रीला
उन्मळून पाडलंय.
आता उद्याचा उषःकाल होताच
तुला एकदा घट्ट बिलगायचं रे!
