काहूर
काहूर
1 min
233
जिंदगीशी युद्ध आता छेडले आहे
मीच माझ्या आसवांना कोंडले आहे.
काळजाच्या माणसांशी ओळखी केली
बेगडी, ढोंगी जनांना सोडले आहे.
लागलीया वाळवी खोडास त्या आता
पाश झाडांचे कुणी हे तोडले आहे?
भाकरीचे घास आमुचे कुठे गेले?
आतड्याला पीळ ज्यांनी पाडले आहे.
एकटा मी जीवनाला बंदिस्त झालो
दाटले काहूर ऐसे मांडले आहे.
