पुन्हा प्रभात हसली पाहिजे!
पुन्हा प्रभात हसली पाहिजे!
1 min
192
जिव्हाळ्याने ओतप्रोत वाणी
माणसे तोडत नाही,
अन् अहंपणाच्या शब्दांचे ओरखडे
बुजता बुजत नाही.
अंधाऱ्या,अज्ञात वाटेवर
बोट धरून कुणीतरी
उजेडाची दिशा दाखवावी...
माणसानं माणसासारखे वागावे
एवढं तर प्रत्येकालाच वाटतं.
काळ सोकावतो आहे,
मन धुमसते आहे,
काळोख छाताडावर नाचतो आहे.
हा जीवघेणा वैताग संपला पाहिजे.
मरणाच्या दारात अडकलेली माणसं
जगली पाहिजे.
अन् निळ्या नभाच्या क्षितिजावर
पुन्हा प्रभात हसली पाहिजे!
