STORYMIRROR

Savita Jadhav

Classics Inspirational

3  

Savita Jadhav

Classics Inspirational

स्पर्श रेशमी

स्पर्श रेशमी

1 min
265

रेशमी स्पर्श तुझ्या हातांचा,

वाटे मजसी हवाहवासा,

कितीही कुरवाळिता तू लडिवाळे,

वाटे सदा नवा नवासा


सान लेकरू आई तुझं मी,

तुझ्या पदराची मिळो छाया,

अखंड अविरत ममतेने भरली,

लोभसवाणी असे तुझी काया


देह शिणला सारा तुझा गं

कोडकौतुक ते पुरवाया,

खंबीरपणे उभी असे तू,

हर एक अडचण सोडवाया


रेशमी स्पर्श तुझ्या हातांचा,

येई गं आई आठव सारखा,

प्रार्थना एकचि प्रभूचरणी,

न व्हावं मी त्या स्पर्शाला पोरका


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics