STORYMIRROR

Shobha Wagle

Romance Classics

3  

Shobha Wagle

Romance Classics

श्रावण सरी

श्रावण सरी

1 min
242

रिमझिम सरी धरावर सांडती

गार वारा प्रिये अंगा शहारती

एकाच छत्रीतुनी चालताना

अंगाला अंग तयांचे धडकती.


उबदार स्पर्श होता येई उभारी

मनी लज्जित ओली चिंब बाई

हळूवार स्पर्श वाटे हवा हवासा

सखीस मात्र दूर होण्याची घाई.


श्रावणात येणाऱ्या सरीवर सरी

हिरवळ दाटे चोहीकडे डोंगरावरी

प्रेमी युगलांच्या स्वप्नांना येई पूर

दोष मात्र सारे देती ते पावसावरी.


खळखळ वाहून जाई झऱ्याचे पाणी

उंच उंच उड्या त्यात मारुनी हर्षती

तुषार पाण्याचे उडवुनी घेती अंगावरी

पावसातली मस्ती प्रेमीची हीच खरी असती.


श्रावणातल्या रिमझिम पाऊस धारा

प्रेमिकांचा फुलवी प्रेमाचा मोहक पिसारा

इंद्रधनुष्य ही असे तयांना तेथे साक्षीला

तन मनाला देई एक रोमांचित शहारा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance